श्रीरंगा कमलाकांता श्रीरंगा कमलाकांता हरीपदरा ते सोड रे ॥ धृ ॥ ब्रीजवासी नारी, जात असो की बाजारी हो कान्हा का मुरारी, अडविता का कंदारी मथुरेच्या बाजारी, पाहु मजा हो गिरीधारी विकुन वनित दहिहोड रे ॥ १ ॥ गायक: सुरेश हळदणकर गीतकार: होनाजी बाळा संगीतकार: हेमंत - केदार नाटक: होनाजी बाळा
देवा घरचे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम ॥धृ॥ मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम ॥ १ ॥ मूळ गायक: रामदास कामत गीत: वसंत कानेटकर संगीत: पं. जितेंद्र अभिषेकी नाटक: संगीत मत्स्यगंधा
Comments