Posts

Showing posts from September, 2007

Hindu aikya ghosh

हिंदू ऐक्य घोष हा निनादुद्या दिगंतरी जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी ॥धृ॥ दिव्य वारसा तुझा विश्वमान्य संस्कृती वैभवात वाढल्या आपुल्या पिढ्या किती हाय दुर्दशा तुझी वेदना उठे उरी ॥१॥ नांदले युगेयुगे अंश ईश्वरी इथे भेदभाव मानिसी मानवा मधे तिथे ऐक्य भाव जागृती कार्य हेच ईश्वरी ॥२॥ उठ मारुती परी सूर्यबिंब ग्रासण्या संघटित शक्ति हो रामराज्य स्थापण्या कालकूट प्राशुनी उठ शंकरा परी ॥३॥ दिव्य शक्तिने तुझ्या दुष्ट दैत्य मर्दिले स्नेह भक्ति शक्तिने दैन्य दुःख वारिले पांचजन्य घोष हो जाग अर्जुना परी ॥४॥

दिनविशेष

दिनविशेष: २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन १८३३ - ब्राह्मो समाजाचे संस्थापक, वृत्तपत्रकार व सतीची प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचे निधन. १९०७ - नामवंत संगीत समीक्षक वामन हरी देशपांडे यांचा जन्म. १९१७ - फ्रेंच चित्रकार, मूर्तीकार एद्‌गार द गॉं यांचे निधन. १९२५ - डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. १९२९ - "काळ' या नितयकालिकाचे संस्थापक संपादक शिवराम महादेव परांजपे यांचे निधन. १९५१ - भारताचे कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा. अलिगड मुस्लिम विद्यापीठ अणि बनारस हिंदू विद्यापीठ विधेयकांना संसदेची मंजुरी. १९५३ - एडविन हबल या खगोल शास्त्रज्ञाचे निधन. १९७२ - ग्रंथालयशास्त्र व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक एस.आर.रंगनाथन यांचे निधन. १९५७ मध्ये सरकारने त्यांना "पद्मश्री' सन्मान प्रदान केला. २००४ - ताजमहाल बांधून पूर्ण झाल्यास ३५० ‍वर्षे उलटल्यानिमित्त ताज महोत्सवास प्रारंभ.

My first blog

I had thought of starting blog since a long time but somehow its getting materialized now. The fueling reason for it is to save the overhead of reworking the worked problems by saving the intermediate info on blog. Thats why I named it "casual" blog. I have been working out few details of laptops as I want to buy one for home use but as the process is not ending since 4 weeks I have lost info of the glossary terms encountered in detailed configuration description of laptops. So I thought to back up the earned info in the form of the posts. Anyways. Here I go...